संविधान देशाचा आत्मा .... सुनील गायकवाड.

Maharashtra varta

.कापूरहोळ (वार्ताहर)जागतिकीकरणाच्या युगात जगभरातील राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आलेली आहेत. जगच जवळ आले आहे. वेगवेगळ्या देशांत लोक उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. अनेक देशांत विविधता वाढत आहे. जगातील सर्वाधिक विविधता असणाऱ्या राष्ट्राचे सर्वश्रेष्ठ मूल्यांचे भारतीय संविधान बदलत्या जागतिकीकरणाच्या युगात संपूर्ण विश्वाला  मार्गदर्शक ठरत असून संविधान हे भारत देशाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले..................................भोर  भोर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की,.आपल्याला निश्चितच भारतीय संविधानाचा अभिमान वाटत असून, संविधानाचे शिल्पकार महामानव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या  संविधान दिनी विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावे. भोर शहरात कार्यलयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  आपलं संविधान यावर आधारित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.भाषणे,रांगोळी, चित्रकला,संविधान वाचन, प्रभातफेरी आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.26 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हा सदस्य राहुल कांबळे ,कार्याध्यक्ष विठ्ठल गायकवाड ,युवक अध्यक्ष विजय ओव्हाळ ,सरचिटणीस दीपक गायकवाड ,स्वप्नील सावंत ,विकेश सपकाळ ,संतोष जाधव,मनीषा कांबळे, रुपाली मोरे अविनाश भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top