.....कापूरहोळ (वार्ताहर) पंचायत समिती, भोर विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दिनांक 14) रोजी बाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. शाळेत या दिवसापासून तंबाखूमुक्त सशक्त पालक या अभियानाला सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने तंबाखू मुक्ती साठी शपथ देण्यात आली होती यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला या उपक्रमाला प्रतिसाद देत काही शाळांत विद्यार्थ्यांना मिठाई वाटून व केक कापून बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम पंडित नेहरू जी यांच्या प्रतिमेचे विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते पूजन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदे येथील शाळेत चित्रकला, रांगोळी ,रंगभरण, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .मुलांना चॉकलेट वाटून बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी तंबाखू मुक्ती ची शपथ देखील देण्यात आली.
