रायरेश्वर तालुका,भोर येथे भव्य ,दिव्य "विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर" संपन्न.

Maharashtra varta

भोर (प्रतिनिधी)
एक पाऊल कृतीशीलतेकडे,विद्यार्थ्यांच्या विकासाचे ही जाणीव  प्रगल्भ ठेवत रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या साक्षीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि इथल्या मातीत स्वराज्याची बीजे रोवली. या मातीच्या उदरात छत्रपतींच्या स्वराज्याचा जन्म झाला. या रायरेश्वराच्या मातीत दिलेल्या बलिदानाच ऋण प्रत्येक भारतीयांवर आहे. आम्हाला या मातीत आजही स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताचा सुगंध येतो. असे प्रतिपादन शिवभक्त कैलास वडघुले यांनी व्यक्त केले.
या ऐतिहासिक मातीतील मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शनिवार आणि रविवारी दि.7 आणि 8 डिसेंबर 2019 रोजी *रायरेश्वराच्या परिसरातील कोर्ले, ओहोळी, वडतुंबी, टिटेघर, पाकिरे वस्ती, करंजे, चिखलावडे,नाटंबी, या गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रायरेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर, कोर्ले येथे राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... 
वाचन संस्कृती वाढावी यासाठी रायरेश्वर महाविद्यालय टिटेघरला अवांतर वाचनासाठी 60 पुस्तकांचा संच देण्यात आला. यात वैज्ञानिक, निसर्गवाचन, ऐतिहासिक व गोष्टींच्या पुस्तकांचा सामावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सामाजिक कार्यातील सहकारी यशश्री क्लासेस उस्मानाबादचे प्रा.रवी निंबाळकर (विज्ञान), प्रा.संतोषजी बारगजे (गणित), तसेच ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबादचे प्रा.वैजीनाथ खोसे (गणित), क्रिएटिव्ह क्लासेस उस्मानाबादचे प्रा.प्रकाश रणखांब (इंग्रजी) हे सर्व शिक्षक खास उस्मानाबाद येथून दूरवरचा प्रवास करून उपस्थित राहिले. कोर्ले गावचे आमचे राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे सहकारी तानाजी चिकणे यांचे नेहमीप्रमाणे सहकार्य लाभले.* उस्मानाबाद शहर व परिसरात शैक्षणिक क्षेत्रात दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षा क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणारे हे सर्व शिक्षक. यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी दहावी, बारावी आणि स्पर्धा परिक्षेच्या परीक्षेत अनेक विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारे अनेक विद्यार्थी घडविले आहेत. अशा अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन रायरेश्वरच्या विद्यार्थ्यांना देता आले..
रायरेश्वर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पुढील काळात देखील कार्यरत राहू या,असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज सोशल फाऊंडेशन  वतीने कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, अनिल माने.यांनी केले आहे.
To Top