गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी योगदान देणे गरजेचे :गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे

Maharashtra varta
भोर (प्रतिनिधी):"पत्रकार विठ्ठल पवार".
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने देशभरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी निष्ठा हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रत्येक शाळांतील शिक्षक यांनी या गुणवत्ता वाढीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भोर पंचायत समिती, भोरचे गटशिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद पुणेचे अशोकजी गोडसे  यांनी केले.

पाच दिवसाच्या प्रशिक्षणाची सुरुवात, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर येथे करण्यात आली आहे .हे प्रशिक्षणाची दुसरा टप्पा आहे. या प्रशिक्षणासाठी एनसीईआरटीने वेब पोर्टलची निर्मिती केली आहे. प्रशिक्षणातील सर्वोत्तम उपक्रमांचा संकलन केले जाणार आहे .राज्यस्तरावर 2 लाख 55 हजार 823 शिक्षक व मुख्याध्यापक यांना एकूण पाच दिवस यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण भाषा ,गणित, विज्ञान ,सामाजिक शास्त्र ,समता, आरोग्य, कला माहिती व तंत्रज्ञान शालेय नेतृत्व विकास अशा घटकांचा सर्वकष विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे .

यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास वाव मिळेल असे शिक्षण विभागाचे नियोजन आहे .भोर पंचायत समिती, भोरचे गटशिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद पुणेचे अशोकजी गोडसे  यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले आहे. कृष्णा फडतरे अधिव्याख्याता, डायट पुणे यांचे सनियंत्रण असणार आहे.प्रशिक्षणाचे सहा टप्पे असणार आहे.प्रत्येक टप्प्यात 150 प्रमाणे 779 शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. त्यासाठी या प्रशिक्षणास व्याख्याते भोर पंचायत समितीचे विषय साधनव्यक्ती सुनीलजी गोरड ,प्रकाश भगत ,तानाजी तारू तसेच उपशिक्षक मनोज पुरंधरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे व नेताजी कंक (प्रभारी केंद्रप्रमुख नाटंबी )व नितीनजी मेमाणे विषय सहाय्यक डायट पुणे हे विविध विषयांवर सुलभक म्हणून काम पहाणार आहेत.संजय रुईकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग भोर हे प्रशिक्षण समनवयक म्हणून काम पहाणार आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.
To Top