.....अन्यथा खेडशिवापुर टोलनाका बंद पाडू:आमदार संग्रामदादा थोपटे.

Maharashtra varta
भोर (प्रतिनिधी): विठ्ठल पवार.
खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोलवसुली बंद करणे, आणि खेड-शिवापूर टोलनाका भोर हद्दीबाहेर कायमचा घालवणे या ‘शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या’ मागण्यांवर जिल्हाधिकारी निर्णय देतील. या निर्णयानंतर कृती समितीच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल” असा निर्णय रविवारी ‘खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती’ची जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी हा टोलनाका भोरफाटयाच्या पुढे तात्काळ हलवा अशी आग्रही भुमिका घेत, सन 2011 च्या सर्वपक्षीय आंदोलना नंतर टोलनाका हटवण्याची प्रशासनाने केलेली अर्धवट कारवाई पुर्ण करावी अशी भुमिका मांडली. तर आमदार भीमराव तापकिर यांनी देखील हीच भुमिका घेत, जर रस्त्याची कामे पुर्ण होत नसतील तर वसुली तात्काळ बंद करा असे अधिकारयांना सुनावले. वाहतुक कोंडी, अपघात, टोलनाक्यावरची अरेरावी, अर्धवट कामे, बेकायदा टोल वसुली यावर समितीचे सदस्य आक्रमकझाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, कृती समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची बोबडी वळली असल्याचे बैठकीत उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले. तसेच टोलनाका भोर फाट्यापुढे हटवण्याबाबत व काम पुर्ण होई पर्यंत टोलबंद करण्याबाबत ऊद्या लेखी भुमिका जाहीर करण्याचे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस आमदार संग्राम थोपटे, आमदार भीमराव तापकीर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, तहसीलदार सुनील कोळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे व्यवस्थापक टी. एन. सिंग, पुणे-सातारा टोल रोडचे अमित भाटीया, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे, कुलदीप कोंडे, दिलीप बाठे, माऊली दारवटकर, डॉ. संजय जगताप, पोपट जगताप, विलास बोरगे, अमोल पांगारे, ज्ञानेश्वर शिंदे, लहू शेलार, दादा पवार, चंदू परदेशी, आणि कृती सामितीचे मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
To Top