भोर तालुक्यातील रस्त्यांसाठी व विविध विकासकामांसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व विकास मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून आणि भोर ,वेल्हे, मुळशीचे युवा नेते विक्रम दादा खुटवड यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मिळण्यासाठी सकारात्मक निर्णय झाल्याने लवकरच या कामाची सुरूवात होणार आहे.
भोर तालुक्यातील वर्षातून धरणक्षेत्रातच गावांना दळणवळणासाठी ७० - ८० किलोमीटर फिरका मारावा लागत असल्याने अनेक गावामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. यासाठी कांबरे ते वेळवंड ही दोन गावे या ठिकाणी पूलाने जोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे या पुलासाठी मंजूर होण्याबाबतचा प्रस्ताव दिला.
भोर वेल्हा तालुक्यातील प्र.जिल्हा मार्ग ४२ कासुडी - सोंडे - चिरमोडी - वेल्हा हा ५५-६० किलोमीटर मधील गुंजण मावळ मधील ५० हून अधिक गावाची दळणवळण चा प्रमुख मार्ग आहे. गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षीत आहे. यासाठी रस्ता केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) नुतनीकरण, मजबूतीकरण,व रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
भोर तालुक्यातील हरिश्चंद्री व वर्वे या १५ किलोमीटर महामार्गलगत असणाऱ्या गावामधील अपघाताची वाढती समस्या व जिवीतहानी संख्या हाजोरापट्टीत आहे. आगामी दुरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
नसरापुर वेल्हातून दिडघर ते हातवे बु. रस्त्यावर गुंजवणी नदीवर असणारा बंधाऱ्यावरील रस्ते वाहतूक जिवघेणी व एकरे वाहतुकीमुळे आमणेसामणे गाड्या बसत नाही. सध्या चालू असलेल्या पुलाची दुरवस्था चिंताजनक असल्यामुळे मोठ्या पुलाचे बांधकाम व रस्ता करणे बाबतचा प्रस्ताव देण्यात आला.
महामार्गवरील शिंदेवाडी ते सारोळा ३० किलोमीटर मधील वाहतुक कोंडी , जिवघेणी प्रवास व अपघातग्रस्त प्रवण क्षेत्र असल्याने प्रवासांची वेळेची व पैशाची हानी होत असल्यामुळे शिंदेवाडी ते सारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील रस्ता व प्लायओव्हरस व सर्विसरोडचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे याबाबत मागणी केली.
पुणे नसरापुर महाड राज्यमार्ग १०६ अनेक दिवासापासून प्रलंबीत आहे. यामार्गामुळे कोकण प्रवास सोपा होणार आहे. नसरापूर वेल्हा मार्गावर मढे ते महाड भागाला जोडणारा मिसिंग रस्त्याच्या लांबीचे सर्वेक्षण सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे याबाबत अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात यावी इतर गोष्टीवर सकारात्मक चर्चा झाली. याबाबतचे सर्व कामांना सकारात्मक चर्चा झाल्याने या कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती भोर वेल्हे मुळशीचे युवा नेते विक्रमदादा खुटवड यांनी "महाराष्ट्र वार्ताला"दिली.
