दापोड्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात.पाबे शाळेचा लोकनृत्य तालुक्यात प्रथम; भजनात वांगणीवाडी शाळा प्रथम.

Maharashtra varta


भोर (प्रतिनिधी): विठ्ठल पवार.
"यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव" अंतर्गत वेल्हे तालुकास्तरीय स्पर्धा दापोडे (ता.वेल्हे) येथील तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडल्या. 
      या स्पर्धेत वेल्हे तालुक्यातील ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन वेल्हे पंचायत समितीच्या सभापती संगीता जेधे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण  गटशिक्षणाधिकारी संजय तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाने तर विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.  

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मुगळे, लक्ष्मण शिळीमकर, विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा गायकवाड, केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू, शिक्षणप्रेमी राजुअप्पा रेणुसे, गणपत रेणुसे, शिवाजी काळे, विषयतज्ज्ञ उध्दव चाटे, केंद्रीय मुख्याध्यापक सुनील शेळके व तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संपत आधवडे यांनी केले. सुरेश कोळी यांनी आभार मानले.
सांघिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विजेते संघ पुढीलप्रमाणे :
लोकनृत्य (मोठा गट) : पाबे शाळा, (लहान गट) : करंजावणे शाळा.
भजन स्पर्धा (मोठा गट) : वांगणीवाडी शाळा, (लहान गट) : ओसाडे शाळा.
लेझीम स्पर्धा (मोठा गट मुले) :  निगडे मोसे शाळा, (मोठा गट मुली) : वाजेघर बुद्रूक शाळा. 
लेझीम (लहान गट मुले व मुली दोन्ही) : रुळे शाळा.
कबड्डी (मुले) : मेरावणे शाळा, (मुली) : रांजणे शाळा.
खोखो (मुले) : केळद शाळा, (मुली) : पासली शाळा.

वैयक्तिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडू (कंसात शाळा) पुढीलप्रमाणे: 
वक्तृत्व स्पर्धा :  लहान गट : साक्षी शिवाजी दारवटकर (कोंडगाव), मोठा गट : स्विटी अनंता वाल्हेकर (वांगणीवाडी).
५० मी. धावणे स्पर्धा: वैष्णवी गोविंद रसाळ (गुंजवणे), १०० मी. धावणे स्पर्धा : तेजस्विनी दीपक दिघे (वेल्हे बुद्रूक).
उंच उडी स्पर्धा :  लहान गट मुले : दीपक उमेश शिरसे(पानशेत), मुली : दीपिका विश्वनाथ नानावत (ओसाडे), मोठा गट मुले : साहिल काशिनाथ जागडे (आंबेड), मुली : आकांक्षा अमोल यादव (कोंडगाव).
लांब उडी स्पर्धा: लहान गट मुले: आर्यन राजू जागडे (आंबेड), मुली : अपेक्षा अंकुश पिलाणे (मांगदरी), मोठा गट मुले : प्रथमेश ज्ञानेश्वर जागडे (आंबेड), मुली : तनुजा प्रकाश शिंदे (सुरवड).
गोळा फेक स्पर्धा : मुले : सुजल आण्णा शिंदे (करंजावणे), मुली : संचिता शिवाजी नलावडे (निगडे मोसे)
थाळी फेक स्पर्धा : मुले : साहिल काशिनाथ जागडे (आंबेड), मुली : निकिता बापू जागडे (आंबेड).

.
To Top