उत्रोली -कारी गणात सभापती पद द्या.... कार्यकर्त्यांची मागणी

Maharashtra varta
पुणे( प्रतिनिधी)
भोर पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.भोरचे सभापती पद कोणाला मिळणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. सभापतीपद हे उत्रोली कारि या गणात द्यावे अशी मागणी या गटातील कार्यकर्ते करीत आहेत.

पंचायत समिती सदस्यांची निवड फेब्रुवारी 2017 मध्ये झाली .त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 4 ,शिवसेना 1, काँग्रेस 1 असे सहा सदस्य निवडून आले. त्यात पहिल्यांदा अडीच वर्षांसाठी नसरापूर भोलावडे गटांमधील सभापतीपदी मंगल बोडके तर उपसभापती पदी लहू नाना शेलार यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी उत्रोली कारी गटात सभापती किंवा उपसभापती देणे गरजेचे होते ते मिळाले नाही.याची चर्चा या गटातील नागरिक करताना दिसत आहे. दोन्ही पदे ही नसरापूर भोलावडे गटाकडे दिल्याने उत्रोली कारी गटावर अन्याय झाला असल्याची भावना या गटातील कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे.  

उत्रोली  कारि गणात सभापतीपद द्यावे  अशी मागणी या गटातून होत आहे .उत्रोली  कारी गटातून विद्यमान उपसभापती श्रीधर किंद्रे आणि पंचायत समिती सदस्या दमयंती जाधव हे इच्छुक आहेत.
To Top