मढे घाट रस्त्या साठी बजेटमध्ये जास्तीत जास्त निधीची मागणी करणार :संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे .

Maharashtra varta
भोर( प्रतिनिधी):विठ्ठल पवार
वेल्हे तालुक्यातील मढे घाट रस्त्या साठी संसदेच्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधीची मागणी करणार असल्याचे सूतोवाच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी केले. 

सोमवार 16/12/2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.रहाणे यांची भेट घेऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. आणि वेल्हे तालुक्यातील मढे घाट रस्त्या साठी तयार केलेला आराखडा दाखवण्यात आला, आणि पानशेत ते घोल मार्गे कोकणात जाणाऱ्या सदर रस्त्या साठी बजेट मध्ये निधी ची मागणी करणार ,यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मतदारसंघातीलवेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, शंकर नाना भुरुक, प्रवीण शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते किरण राऊत,प्रमोद लोहकरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
To Top