भोर( प्रतिनिधी):विठ्ठल पवार.
देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सलग १६ वर्ष रक्तदान करणारे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनीलजी लोणकर यांनी रक्तदान करून एक समाजाला वेगळा आदर्श घालून दिला असून नवा प्रेरक विचार निर्माण केला आहे.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे निमंञित सदस्य मा. शिवाजी आप्पा पोमण मित्र परिवाराच्या वतीने सासवड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.रक्तदान शिबीराचे हे सलग १६ वे वर्ष आहे. या शिबिरास उपस्थित राहून अनेकजण रक्तदान करतात.एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते.परंतु तो उपक्रम अखंडपणे चालविणे कठीण गोष्ट असते.या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजीआप्पा पोमण यांनी व त्यांच्या मिञपरिवाराच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचा उपक्रम अव्याहतपणे चालू ठेवला आहे. .या रक्तदान शिबीरात पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर यांनी सलग १६ वेळा अखंड 16 वर्ष रक्तदान केले. त्यांचे रक्तदानाचे हे 16 वे वर्ष .खरे तर एखाद्या नैमित्तिक प्रसंगी त्याच दिवशी एखाद्या उपक्रमात सहभागी होणे ती अशीच घटना म्हणजे दिनांक 12 /.12 च्या वेळेस .माननीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही खूप मोठी गोष्ट आहे.याचा मनस्वी आनंद व समाधान सुनीलजी लोणकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या या 16 वर्षांच्या अखंड रक्तदानाचे पुरंदर तालुक्यात व पुणे जिल्ह्यात मोठे कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
यावेळी बापूसाहेब बडधे ,शिवाजी साळुंके,.गणेश होले,हनुमंत झेंडे उपस्थित होते.
