भोर (प्रतिनिधी):विठ्ठल पवार.
आपल्या निसर्गदत्त बावनकशी अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवादाची कास धरून समाजामध्ये एक नवी प्रतिभावंत जागृती करणारा, रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.
त्यांच्या जाण्याने रंगभूमी बरोबरच चित्रपटसृष्टीतला एक लखलखता कसदार नाणे असलेला सूर्य तारा अंतर्धान पावला .गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांनाही समृद्ध केलं. डॉक्टर श्रीराम लागू अतिशय विरळ व्यक्तिमत्व होतं. आयुष्यभर सच्चेपणा जगणारा माणूस होता. त्यांच्याकडे खोटं नावाची गोष्ट नव्हती .जगायचं तर तर्क निष्ठेने , कुठली गोष्ट तावून-सुलाखून विश्लेषण करूनच ते जगले. त्यांनी माणसाचे महत्त्व खूप मानलं. सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांची व्यक्तिरेखाही तेवढ्यात जोमात, सर्वांना सामावून घेणारी होती .त्यांनी केलेल्या सर्व भूमिकांमध्ये एक विचारांची वेगळी बैठक होती.
त्यांचा अभिनय काळजात हात घालणारा होता. ते ज्यावेळी बोलत असेल त्यामागे एक विचार होता .मी जिंकलो, मी हरलो, हिमालयाची सावली, नटसम्राटमध्ये केलेल्या भूमिकांची छाप डोक्यातून जाऊ शकत नाही. अंधार प्रकाशात दिसलेले लागू हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं ."महाराष्ट्र वार्ताच्या वतीने" व तमाम चित्रपट रसिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
