(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबाडे येथील इयत्ता सहावी मधील हरिभक्त परायण शंकर रोंगे याचे बालकांना उदबोधित करणारे सुश्राव्य किर्तन)
-------------------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी) विठ्ठल पवार.(महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन)
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाडे, तालुका- भोर जिल्हा पुणे येथे दर शनिवारी दप्तराविना शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे शालेय व सहशालेय उपक्रम अखंडपणे राबवले जातात. या वर्षात कोण बनेल ज्ञान पती ,काव्यसंमेलन, दीपोत्सव, ड्रामा कॉम्पिटिशन ,मुलाखत देश सेवकांची, भोंडला, विज्ञान जत्रा ,शाळा मंत्रिमंडळ ,निवडणूक, हरिपाठ, आणि गायन असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2019 रोजी दप्तराविना शाळा अंतर्गत आध्यात्मिक विषयाला स्पर्श करणारा मूल्यवर्धित व संस्कारक्षम असा बाल कीर्तनाचा उपक्रम संपन्न झाला.
इयत्ता सहावी मधील हरिभक्त परायण शंकर रोंगे याचे बालकांना उदबोधित करणारे सुश्राव्य किर्तन झाले. या किर्तनास द्वारकेश शिंदे इयत्ता नववी व आशुतोष मोरे इयत्ता सातवी यांनी पखवाज वादन व गायनास सुरेख साथ दिली.वारकरी शिक्षण संस्था आंबाडे चे संस्थापक अध्यक्ष ह.भ. प. मोहन महाराज शिंदे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभलेले आहे.
याप्रसंगी संस्थेचे शिक्षक हरिभक्त परायण रामचंद्र महाराज सारंग ,या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी खोपडे, शिक्षक राजू कारभळ, खंडू घोलप ,उज्वला गिरगोसावी उपस्थित होते.
नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाडेला भोर तालुका सभापती चषक 2019 प्राप्त झालेला आहे. .आणि त्याच शाळेतील हा बालक कीर्तनाचा उपक्रम आहेत. आणि या बालक कीर्तनाच्या उपक्रमाची तालुकाभर चर्चा असून या शाळेचे उपक्रम आदर्श आणि प्रेरणादायी आहेत.
