भोर (प्रतिनिधी)
संघर्ष सूर्याच्या बछड्यांना
अंधाराची नसे फिकीर...
अंगार धमन्यातून वाहतो
संघर्षाचे आम्ही फकिर...
असा शिक्षकांस मूलमंत्र देवून चळवळ शिकवणारे असामान्य व्यक्तिमत्व, त्यांनी प्रत्येक कृतीतून साधेपणा जपला.
दूरदर्शी, दिलदार नेतृत्व, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. आमदार शिवाजीराव (आण्णा ) पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
अखंड भारताच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा क्रांतीसूर्य , भारतीय प्राथमिक शिक्षण संघटनात्मक महर्षि ,त्यागी, तपस्वी,अखंड उत्साहाने,आपल्या तेजस्वी कार्याने प्राथमिक शिक्षक ते आमदार,अभ्यास-पाठ्यपुस्तकमंडळ, दाेन वेळा विधिमंडळात अभ्यासू सदस्य,लखलखीत वक्तृत्व,राजबिंडे व्यक्तीमत्व, आदरणीय वसंतदादा,शरद पवार,बाळासाहेब ठाकरे,यशवंतराव चव्हाण,कर्मयोगी कर्मवीर आण्णा,प्र.के.अत्रे,आचार्य दाेंदे ,आचार्य विनोबा भावे आचार्य भिसे आदी महान व्यक्तिमत्वासोबत आयुष्य जगलेले आदरणीय अण्णां.
प्राथमिक शिक्षकांसाठी सातत्याने अखंड गेली 54 वर्षे सदनशिर लाेकशाही मार्ग रचून नियमित पगार,वाहनभत्ता,घरभाडे, केंद्राप्रमाणे वेतन आयाेग,अर्जित रजा,असे असंख्य प्रश्न साेडवण्यासाठी अत्यंत कल्पकतेने राज्याचे आजवरचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्री, आमदार खासदार इ. शासनकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशने घेतली. सुमारे तीन लाख प्रतिनिधी उपस्थित ठेवणारा,शासनाला वठणीवर आणणारा अवलिया, बाहुबली नेता, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे संकल्पक, संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री.शिवाजीराव पाटील साहेब.
