(वेल्हे खुर्द(ता.वेल्हे): सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे उद्घाटन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपस्थित अधिकारी व पदाधिकारी.)
-------------------------------------------------------------------
.भोर (प्रतिनिधी): विठ्ठल पवार.
"व्हीएसटीएफ व जनसेवा फाऊंडेशन" यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या वेल्हे खुर्द(ता.वेल्हे) येथील सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात २८८ जणांची तपासणी करण्यात आली.
या शिबीरात १३० महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, १०० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान २३ रुग्णांना पुढील उपचारासाठी आंबी येथील रूग्णालयासाठी संदर्भित करण्यात आले. त्याचबरोबर ३५ लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात दाखल झालेल्या प्रत्येक रूग्णाला जनसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर व्हिएसटीएफ यांच्या वतीने ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी लोकांना कचरापेटींचे वाटप करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेल्हे पंचायत समितीच्या सभापती संगीता जेधे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी संजय तांबे, विस्तार अधिकारी महेश दळवी, विद्याधर ताकवणे, जनसेवा फाउंडेशनचे डॉ. गणेश जाधव, डॉ. चव्हाण, मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक सचिन निकम, माजी सरपंच प्रकाश जेधे, सरपंच पुष्पलता सुतार, ग्रामसेवक अमोल थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
