भोर (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
शाळेतील शिक्षकांनी सुयोग्य ,अचूक पद्धतीने अध्ययन- अध्यापन केल्यास शाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रगतीच्या बाबतीत पुढे असेल.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्षमता ओळखुन त्या समृद्ध केल्यास विद्यार्थ्यांच्या  कलागुणांचा विकास  होईल.अश्या गुणवत्तेने कांबरे खे. बा. येथील शिक्षक उत्कृष्ट  काम  करत असून "कांबरे शाळेचा गुणवत्तेचा दर्जा चांगला आहे" असे गौरव उदगार .भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी काढले.

भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विशाल तनपुरे हे भोर पंचायत समिती विकास गटांतील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अचानक भेट देऊन तपासणी करत असताना,त्यांनी  कांबरे खे. बा. तालुका भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ( दिनांक 20) रोजी सायंकाळी 4वाजून 30 मिनिटांनी अचानक  भेट दिली .इयत्ता पाचवीतील वर्गास भेट दिली .या वर्गाचा एकूण पट 14 असून उपस्थिती देखील 14 होती. त्यांनी  विद्यार्थ्यांच्या शुद्धलेखनाच्या वह्या पाहून  विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर असून समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची हस्ताक्षराची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाबाबत प्रश्न विचारले,  काळ ओळखा, काळ बदला, यावर आधारित प्रश्न सोडविण्यास सांगितले ते विद्यार्थ्यांनी सोडवून तोंडी प्रश्नांची  विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिली. या इयत्तेला शिकविणारे शिक्षक उत्तम भोसले सरांच्या अध्यापनाचे कौतुक केले. एकंदरीत शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत ,उत्तम शेरा देत शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक संजय वाल्हेकर, विकास खुटवड,बाळकृष्ण यादव,उत्तम भोसले ,सुरेश चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते.