"राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पहिल्याच परीक्षेत नापास".

Maharashtra varta
.भोर (प्रतिनिधी)......
.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात गुरुवारी ,(दिनांक -19)नसरापूर तालुका- भोर ,येथील उड्डाणपुलाच्या शेजारील सेवा रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सेवा रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर 70 टक्के काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. कामाची परिस्थिती पाहण्यास आलेल्या समितीने यावर नाराजी व्यक्त केली .यावरून पहिल्याच परीक्षेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नापास झाले असल्याची चर्चा व मत जिल्हाअधिकारी यांनी स्थापन केलेल्या समिती सदस्यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केली.
"पुणे-सातारा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी,पुणे  यांनी स्थापन केलेल्या समितीने गुरुवारी पुणे- सातारा रस्त्यावर चेलाडी फाटा येथील सेवा रस्त्याची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल शुक्रवारी दिनांक 20 ला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल असे भोरचे तहसीलदार अजित सिंह पाटील यांनी सांगितले". 

पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याची कामानुसार वेगळी मुदत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली .त्यांनी दिलेल्या मुदतीत ही कामे पूर्ण होतात की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चेलाडी येथील उड्डाणपूल सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी 19 डिसेंबर ही तारीख दिली होती .त्यानुसार या समितीने गुरुवारी सायंकाळी येथील सेवा रस्त्याची पाहणी केली. 

यावेळी भोरचे तहसीलदार अजित पाटील ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय देशपांडे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे  ठाणगे. कृती समितीचे सदस्य माऊली दारवटकर ,दिलीअप्पा बाठे,शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली शिंदे ,मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदू भैय्या परदेशी ,दादा पवार, आदित्य बोरगे, राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे  अमोल पांगारे आदी उपस्थित होते.

To Top