खेड-शिवापूर टोल नाका बंद करा.खा.सुप्रिया सुळे यांची मागणी,

Maharashtra varta
पुणे,दि.१९(प्रतिनिधी) –
 "पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या महामार्गाचे काम देखील रखडले आहे. हे काम २०१० साली सुरु करण्यात आलं होतं. ते २०१३ पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु २०१९ साल संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही हे काम पुर्ण झाले नाही. *रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांची अडचण दूर करावी अशा आशयाची पत्रे दिलेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मा. जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेली आहेत.अतिशय संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय वाहनचालकांचाही खोळंबा होत आहे. त्यामुळे हा टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे

प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोट मध्ये पुढे   
खासदार सुळे म्हणाल्या ,की या रस्त्यावरुन दोन तासांच्या प्रवासाला सहा तास लागत आहेत.महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील सर्विस रोडची कामे अयोग्य पद्धतीने केल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिकांच्या गरजा लक्षात न घेता सर्विस रोड तयार करण्यात आल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर यावे लागते. परिणामी या परिसरात कोंडी होते. मध्यंतरी मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी देखील या रस्त्याच्या कामात अनियमितता झाली असल्याचे मत नमूद केले आहे. याशिवाय महामार्ग कंत्राटदारांनाही वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत पुर्ण करावे अशा आशयाची सुचना दिली आहे.परंतु तरीही कंत्राटदारांनी विहित वेळेत या रस्त्याचे काम पुर्ण न केल्यास खेड-शिवापूरचा टोल नाका बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. 

खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, उत्तम रस्ता आणि त्याची उत्तम देखभाल यासाठी टोल आकारला जातो. परंतु खेड-शिवापूरच्या टोलनाक्याबाबत तशी स्थिती आढळत नसून जनतेच्या पैशांची ती लूट आहे, याची कृपया नोंद घ्यावी. यामुळे हा टोलनाका तातडीने बंद करण्यात यावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

To Top