सौंदर्य, परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास यांचा सुरेख संगम असलेल्या वीर महालक्ष्मीमध्ये ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक वस्त्रांची निवड उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये साड्या, लहंगा, कुर्ती सेट आणि ड्रेस मटेरियल यांसह विविध प्रकारच्या फॅशनेबल व पारंपरिक कपड्यांचा समावेश आहे.
शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून २० टक्क्यांपासून तब्बल ७० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदीप्रेमींसाठी हा शुभारंभ विशेष पर्वणी ठरणार आहे.
इंडियन पेट्रोल पंपाच्या मागे, गट नंबर २३३, अ/प हरीशचंद्र, कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे – ४१२२०५ येथे वीर महालक्ष्मीचे दालन सुरू होत आहे.
नव्या सुरुवातीच्या या आनंदसोहळ्याला ग्राहकांनी, परिसरातील नागरिकांनी आणि शुभेच्छुकांनी आवर्जून उपस्थित राहून वीर महालक्ष्मीला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

