मुख्य संपादक प्रतिनिधी :
पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी आज 11 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जाळीत उडी मारत अनोखे आंदोलन केले.
28 एप्रिल 2026 रोजी कापूरव्होळ येथील हायवेवरील अतिक्रमण कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद दळवी, त्यांचा मुलगा व अन्य दोघांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पाचकाळे यांनी केला आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये जाणीवपूर्वक अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतःस व कुटुंबास संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

