भोर तालुक्यात गट गण रचनेत मोठा फेरबदल; संगमनेर गणाचं नाव बदलून ‘कामथडी गण’ – नसरापूर गणात नव्या गावांचा समावेश

Maharashtra varta





भोर  (प्रतिनिधी):-
पुणे जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणाच्या रचनेवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून भोर तालुक्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अशी  
सूत्रांची माहिती मिळत आहे.या बदलांमुळे काही गावांचा गण बदलला असून राजकीय समीकरणात मोठा उलथापालथ होण्याची चिन्हे असल्यााचं दिसून येत आहे. 

तेलवडी (ता. भोर) येथील चेतन धावले यांनी भोंगवली गटाच्या रचनेबाबत हरकत नोंदवली होती. त्यांनी नमूद केले होते की, वर्तुळाकार पद्धतीमुळे संगमनेर आणि भोंगवली गण या दोन्हींमध्ये तांभाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक या गावांचा दुहेरी समावेश होतो. ही गावे गुंजवणी नदी लगत असल्याने वर्तुळाकार पद्धत आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन त्यांचा समावेश नसरापूर गणात, पर्यायाने वेळू गटात करण्याची मागणी त्यांनी केली होती.

तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी उंबरे, कामधडी, करंदी, खेबा ही गावे संगमनेर गणात समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी याबाबत आपले अभिप्राय मांडले. आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांनी सुनावणी घेत अर्जदारांची मागणी मान्य केली.

यामुळे संगमनेर ग्रामपंचायतीची लोकसंख्या 1,959 असून, कामथडी ग्रामपंचायत लोकसंख्या 2,452 असल्याने संगमनेर गणाचं नाव बदलून ‘कामथडी गण’ करण्यात आलं आहे.

या बदलांमुळे बोटांवर मोजणारे खुश, तर काहींच्या चेहऱ्यावर चिंता… आगामी निवडणुकांमध्ये या फेरबदलांचा ठळक परिणाम होणार हे नक्कीच! अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

थोडी खुशी… ज्यादा गम!


आगामी काळात वेळू नसरापूर नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद गटात व कामथडी भोंगवली जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालत होण्याची शक्यता  असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले आहे



To Top