सेवाभावी शिक्षकी जीवनाची गौरवशाली सांगता : इन्नूसखान हसन कडेकर यांचा सेवानिवृत्ती अभिष्टचिंतन सोहळा होणार उत्साहात.

Maharashtra varta


न्यूज वार्ता मुख्य संपादक –विठ्ठल पवार सर.

 पीएम श्री.  केंद्रशाळा खंडाळा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील ज्येष्ठ उपशिक्षक श्री. इन्नूसखान हसन कडेकर हे दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी शासकीय सेवेतील प्रदीर्घ कार्यकाळानंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा “सेवानिवृत्ती अभिष्टचिंतन सोहळा” शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी 1 वाजता खंडाळा येथील विराज मंगल कार्यालय, यशवंतनगर, पारगाव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.


या सोहळ्याचे उद्घाटन मा.ना. श्री. मकरंद पाटील (आबा) मदत  व पुनर्वसन, मंत्री महाराष्ट्र राज्य  व पालकमंत्री बुलढाणा जिल्हा  यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती मा. श्री. नितीनकाका पाटील (खासदार), मा. श्री. बकाजीराव पाटील ( मा.चेअरमन , सा.जि.म. बँक, सातारा) व मा. श्री. शंकरराव गाढवे सर (मा.उपाध्यक्ष, जि. प.सातारा) , नितीन बापू भरगुडे पाटील (मा. उपाध्यक्ष जि . प .सातारा) व खंडाळा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक ग्रामस्थ हे उपस्थित राहणार असून.श्री. कडेकर सरांच्या शिक्षकी योगदानाचा गौरव  करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, विद्यार्थ्यांवरील प्रेम, आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग या बाबींचा या सोहळ्यात विशेष उल्लेख होणार आहे.

सदर कार्यक्रम पंचायत समिती खंडाळा (शिक्षण विभाग) व सकल मुख्याध्यापक व शिक्षक वृंद खंडाळा. मुख्या. व सहकारी शाळा खंडाळा, व ग्रामस्थ मंडळ खंडाळा / कण्हेरी, गुरुजन विकास मंच खंडाळा व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.




To Top