खेडशिवापुर (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर.
26 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळूच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी LEF आणि Amazon Future Engineer यांच्या तर्फे आयोजित जिल्हास्तरीय CS हॅकाथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यातील 4468 विद्यार्थ्यांमधून अंतिम स्पर्धेसाठी केवळ 30 विद्यार्थी आणि 10 शिक्षकांची निवड झाली, त्यामध्ये वेळू शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश असल्याने शाळेचा मान वाढला आहे.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणातून निवडलेल्या विषयांवर कोडिंगच्या माध्यमातून सादरीकरण केले. हा CS हॅकाथॉनचा पहिलाच अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. उत्कृष्ट सादरीकरणासाठी वेळू शाळेला बक्षिसे प्रदान करण्यात आली.
LEF चे हेड इम्रान सर, Amazon Future Engineer चे HOD तुषार झा सर आणि DIET चे प्राचार्य महेश शेंडकर साहेब यांच्या हस्ते शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
बक्षिसांमध्ये प्रशस्तीपत्रक, 2 टॅब (70,000 रु.), 2 टॅब कव्हर, अलेक्सा स्पीकर (5,500 रु.), आणि रोख रक्कम 500 रु. यांचा समावेश होता.
मार्गदर्शक शिक्षक:
अश्विनी गोविंद गुरव
बक्षीस पात्र विद्यार्थी:
- काव्या जाधव
- सचिन भोंडवे
- वेदांती ओझा
वेळू शाळेच्या या दिमाखदार यशामुळे शाळेचा स्तर उंचावला असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास व आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, हे अधोरेखित झाले आहे.