स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना मतदार धडा शिकवणार:-आमदार संग्राम थोपटे
संपादक न्यूज वार्ता
स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना मतदार धडा शिकवणार: असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील मुठा, जातेडे, आंदगाव, खारावडे, लव्हार्डे, कोळावडे येथे आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यानी आपुलकीने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
मुठा हे कै. मामासाहेब मोहोळ यांच गाव. कुस्ती क्षेत्रातील प्रख्यात आणि नावाजलेले गाव. आदरणीय मामा साहेबांनी अभिमान वाटावा इतकं मोठ्ठं कार्य इथे केले. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत एकही निवडणूक या मुठा गावात झालेली नाही. विविध विकासकामांच्या माध्यमातून आपली या गावाशी एक नाळ जोडलेली आहे. या गावात मोरेवाडी रस्ता, स्मशानभूमी रस्ता, पिण्याच्या पाण्याची योजना, भोई आळी मधील सामाजिक सभागृह अशी अनेक काम आपल्या माध्यमातून झाली आहेत. राहिलेली काही कामे आपण थोड्याच दिवसात मार्गी लावणार आहोत. असे थोपटे म्हणाले.पुढे ते म्हणाले की,
जातेडे येथे देखील विकासकामांच्या जोरावर येथील जनता आपल्या सोबत आहे. विविध स्वरूपाची विकासाची कामे इथे आपण केलीत. गावाला जोडणार रस्ता, गावातील अंतर्गत रस्ता, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय ही सर्व कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. सभा मंडपाचे प्रलंबित काम देखील लवकरच मार्गी लागेल त्याबद्दल चिंता नसावी.
आंदगाव हे गाव देखील कायमच आपल्याला साथ देत आले आहे. गावातील विकासकामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे यांचे स्मारक व्हावं ही इथल्या गावकऱ्यांची अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे. याठिकाणी सभामंडप करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.
खारावडे हे मुळशी तालुक्यातील महत्त्वाच्या गावांपैकी एक गाव होय. 'आपली विजयी मिरवणूक याच गावातून निघणार असल्याचा निर्धार' येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवला. येथील म्हसोबा हे जागृत देवस्थान असून, या देवाचा आशीर्वाद कायमच आपल्या सोबत आहे. आपण कुठलाही पक्ष न बदलता कायम एकनिष्ठ राहून केलेलं राजकारण आणि समाजकारण येथील जनतेला देखील पटलेले आहे.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.