भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील कातवडी, डावजे, कोंढुर, जातेडे, मुठा, आंदगाव, खारावडे, कोळावडे, लव्हार्डे, लवासा सिटी, भोडे, वातुंडे, वांजळे, माळेगाव, मारणेवाडी, उरावडे, बोतरवाडी, पिरंगुट, भुकूम, भुगांव या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले या भागातील मुठा ते मुळशी तालुका हद्दी पर्यंतचा रस्ता यासाठी १ कोटी, वांजळे येथे ब्रीज बांधणे ६ कोटी, पूरहानी कार्यक्रमांतर्गत लवासा सिटी रस्ता १० कोटी, भोईनी रस्ता करणे १७ कोटी त्याचबरोबर पानशेत ते लावासा सिटी रस्ता ४ कोटी, पडळघरवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे ६ कोटी, डावजे चोरघे वस्ती रस्ता, लव्हर्डे - वेगरेवाडी- धनवेवस्ती रस्ता, भोडे सपकाळवस्ती रस्ता, आंदगाव -गुजरवाडी रस्ता, आंदगाव- लोहारवाडी रस्ता, माळेगाव -शेडगेवाडी अंतर्गत गटर, हनुमानमंदिर सभामंडप त्यांचबरोबर पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते अशी प्रत्येक गावातील आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली.
वाढती लोकवस्ती पाहता भुगांव व भुकूम या दोन गावांना अधीकचा पाणी पुरवठा करणे, भुगांव, भुकूम गावातील झालेली विकास कामे, भुगांव बाह्यवळण रस्ता, घनकचरा व्यवस्थापन करणे याकरिता PMRDA कार्यकारी अधिकरी यांच्या समवेत वेळोवेळी बैठक घेऊन संदर्भात पाठपुरावा करून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.
उरावडे येथे SVS अॅक्वा या सॅनिटायझर बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील आगीत दुर्देवी मृत पावलेल्या १७ कामगारांच्या वारसांना प्रत्येकी रु.५ लक्ष व जखमी झालेल्या कामगारांना प्रत्येकी रु.१२,७००/-मिळवून देण्यात आले.
चक्रीवादळाचा तडाका बसल्यामुळे मुळशी तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या खारावडे गावातील नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम करता आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुळशीकर सुज्ञजनता केलेल्या विकास कामांमुळे तसेच निष्ठावंत शिवसैनिक यांच्यासह महाविकास आघाडीने एकदिलाने काम करून लोकसभेला संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना मोठे मताधिक्य दिले त्याच विश्वासाने माझ्या सोबत सर्व असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मा.खासदार अशोकआण्णा मोहोळ, महादेवआण्णा कोंढरे, गंगाराम मातेरे, संग्राम मोहोळ, माऊली शिंदे, भानुदास पानसरे, भरत पाटणकर, अविनाश बलकवडे, सविताताई दगडे, सुरेखाताई तोंडे, दिपालीताई कोकरे, स्वातीताई ढमाले, निकिताताई सणस, राणीताई शिंदे, अशोक मातेरे, बाबाजी शेळके, कैलास मारणे, गोविंद सुरवसे, अंकुश तिकोने, बाळाभाऊ गुरव, सागर मारणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.