उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याची गाडी जाळण्याचा प्रयत्न

Maharashtra varta

उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याची गाडी जाळण्याचा प्रयत्न


संपादक

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसह वातावरण अधिकारी तापू लागलेलं असताना राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश बंडखोरांना आपले अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र काही ठिकाणी बंडखोरांनी आपला अर्ज कायम ठेवला आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीने निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे मात्र, काही ठिकाणी बंडखोरी कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच, पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिव्यांग  उमेदवार विनायक ओव्हाळ यांच्याकडून हा प्रयत्न झाला असून काळेवाडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, ओव्हाळ यांनी हे पाऊल का उचललं याबाबतचं कारण अद्याप ही स्पष्ट झाले नाही.

To Top