केळवडे गावातील जाहीर पक्षप्रवेश!
संपादक न्यूज वार्ता
भोर तालुक्यातील केळवडे येथील श्री.पै.देवदत्त आबा कोंडे यांच्यासह सागर महेश मरळ, आकाश संजय कोंडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी सर्वांचे सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी भोर पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक के.डी.भाऊ सोनवणे, शिवाजी नाना कोंडे, सुधीर खोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, संचालक शहाजी बोरगे, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मदन अण्णा खुटवड, अरुण मालुसरे, भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बंटी कोंडे यांसह दत्ता कोंडे, लालू आप्पा कोंडे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.