काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश!
(न्यूज वार्ता ):-संपादक लेखणी
भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील करंदी खे.बा येथील शिवसेना शिंदे गट प्रणित श्रीमंत काळेश्वरी नवरात्र उत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी विकास कामांवर प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामध्ये मंडळाचे अध्यक्ष संभाजी खाटपे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तुळशीराम थिटे, तानाजी खाटपे, उपाध्यक्ष भानुदास थिटे, शांताराम शिंदे, दादासो येणुपुरे, दत्तात्रय खाटपे, निवृत्ती बोरगे, अनिकेत बोरगे, कुंडलिक बोरगे, अक्षय खाटपे, विशाल येणुपुरे, भरत खाटपे, चंद्रकांत साबळे, प्रकाश गायकवाड यांचा समावेश आहे.
प्रसंगी भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, भोर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बोरगे,विशाल बंटी कोंडे,विजय लालूअप्पा कोंडे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, माजी उपसभापती सोमनाथ निगडे,काँग्रेस उपाध्यक्ष सिद्धेश्वरबापू गायकवाड, संचालक शहाजी बोरगे, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.