उद्या 4 थ्या दिवसापासून जलत्यागाचा निर्णय .

Maharashtra varta

 उद्या 4 थ्या दिवसापासून जलत्यागाचा निर्णय 


वर्धा ( प्रतिनिधी):-स्पेशल रिपोर्ट

जुनी पेन्शनसाठी आमरण उपोषण वर्धा येथे 3 दिवसांपासून सुरू आहे. जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आजचा 3 रा दिवस होता, तरीदेखील याकडे डोळेझाक करणाऱ्या असंवेदनशील सरकार च्या निषेधार्थ उद्या 4 थ्या दिवसापासून जलत्याग करण्याचा निर्णय उपोषणकर्त्या आंदोलकांच्या वतीने घेण्यात आलेला आहे..

उपोषणकर्ते संजय सोनार मामा यांची तब्बेत खालावली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे. निगरगट्ट शासनाला अजूनही पाझर फुटत नाहीय., असे उपोषण आंदोलन कर्ते यांचे म्हणणे आहे,



जलत्यागाचा निर्णय राज्यभरातील जुनी पेन्शन शिलेदारांच्या काळजाचा ठोका वाढवणारा, पण यानिमित्ताने सरकारची ही असंवेदनशीलता राज्यातील सर्व 18 लाख कर्मचारी व जनता बघत आहे.No pention, no vote.जो पेन्शन की बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.




To Top