राजगड कारखाना सुरू करणार:- आमदार संग्राम थोपटे.
कापूरहोळ (प्रतिनिधी):-
राजगड सहकारी साखर कारखान्यास एन सी डी सी या संस्थेने कर्ज मंजूर करून राज्य सरकारला कारखान्याने कळवले होते ,त्यानंतर एक बैठक झाली त्यामध्ये राजगड सहकारी साखर कारखाना आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यात तूर्तास वगळण्यात यावे तसेच तहकूब ठेवण्यात यावी अशा पद्धतीचे सुनावली झाली, ती सुनावणी मुळातच अन्यायकारक होती, यामध्ये राजकीय वास येत आहे संग्राम थोपटे म्हणून कोणाचा काय आक्षेप असेल तरीसुद्धा कामगार आणि सभासदांना बद्दल आक्षेप असल्याचे काही कारण नाही बहुतांशी कामगारांचे पोट या कारखान्यावर अवलंबून आहे सभासद शेतकऱ्याच्या उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे हे कर्ज नामंजूर करणे गरजेचे नव्हते न्यायालयीन याचिका दाखल करून त्याची सुनावणी सुरू आहे, निर्णय आमच्या बाजूने लागेल अशी आशा आहे. राजगड कारखाना आम्ही सुरू करण्याचे ठरवले असून 14 नोव्हेंबर नंतर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न सर्व संचालकांचा असणार आहे, आगामी काळात राजगड सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन संग्राम थोपटे यांनी केले.
भोर राजगड मुळशी तालुक्याचे आमदार व राजगड सहकारी साखर कारखाने संचालक संग्राम थोपटे यांचे अध्यक्षतेखाली राजगड सहकारी साखर कारखान्याची 2023 -24 ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेला कारखान्याचे संचालक ,शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस या सभेच्या अहवालाचे वाचन कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील यांनी केले. याप्रसंगी व्हाईस चेअरमन पोपटराव सुके ,सुभाष कोंढाळकर, उत्तम थोपटे,अरविंद सोंडकर, सुधीर खोपडे, विकास कोंडे, दिनकरराव धरपाळे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, चंद्रकांत सागळे, अशोक आबा शेलार, दत्तात्रय चव्हाण, प्रतापराव शिळीमकर, संदीप नगीने, व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन पोपटराव सुके यांनी मानले.