निधी आमच्या हक्काचा! :-आमदार संग्राम थोपटे.
पुणे (प्रतिनिधी):-
जिल्हाधिकारी हे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सचिव आहेत त्यांना माझे मागणे आहे सचिव या नात्याने आपल्या माध्यमातून जो या दुर्गम आणि डोंगरी भागातील विकासाचा निधी मागितला आहे तो आपण उपलब्ध करून द्यावा. जनता जनार्दन पाहत असते शेवटी चुकीचं राजकारण करणाऱ्यांचे या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समिती निधी वितरणातील भेदभाव व राज्य सरकार विरोधात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी जगताप, शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी आमदार संग्राम थोपटे मनोगत व्यक्त करत असतानाम्हणाले की, भोर, पुरंदर, शिरूर - हवेली या तीनही मतदारसंघांना कुठल्याही प्रकारे आमदारांनी सुचवलेल्या कामाचा एकही रुपयाचा निधी दिला नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही सर्वजण निमंत्रित सदस्य म्हणून काम करतो. यापूर्वी देखील वेळोवेळी कामाच्या स्वरूपात सूचना मागितल्या त्या त्या सूचना मी आजपर्यंत त्यांना दिलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात विविध पत्राच्या रूपाने मागण्या करून परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता निकषाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला निधी उपलब्ध करून दिला. परंतु आता लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही येत आहे... हम करे सो कायदा... मी म्हणेल तेच खरं ! अशा पद्धतीची प्रवृत्ती अलीकडच्या काळात राजकारणामध्ये आपल्यासमोर दिसत आहे. आज पालकमंत्र्यांनी खरंतर दुजाभाव करणे गरजेचे नव्हतं, एका अर्थाने विकासाला खोडा घालण्याचे काम या ठिकाणी केल आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघाने त्यांना मताधिक्य दिले नाही राजकीय उद्देश ठेवून निधी वाटपामध्ये केला जात असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी आजपर्यंत असं कधीही केलं नव्हतं. पंधरा पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो सरकार येतात, सरकार जातात कुठलेही सरकार आले तरी आजपर्यंत अशा पद्धतीचा दुजाभाव झालेला नव्हता. एक नवीन पायंडा या सरकारच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्यांनी केल्याचे चित्र समोर दिसते.