पुणे जिल्ह्यातील शिक्षक मोर्च्यास परवानगी नाकारली,मोर्चा स्थगित,
पुणे( प्रतिनिधी):-न्यूज वार्ता टीम
आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या व ५ सप्टेंबर २०२४ च्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागावर दुरगामी परिणाम होणार आहेत. अशा अनेक निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यातील सर्व संघटनांच्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीने शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून या निर्णयाला विरोध करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या वतीने दिनांक २५/०९/२०२४ रोजी दुपारी १३:०० वाजता जिलाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदन दिल्यानंतर तेथे सभा होऊन मोर्चाची सांगता होईल तरी सदरच्या मोर्चाला परवानगी मिळण्याबाबतचे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झाले आहे. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी मा. पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांचे आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३), व (४) अन्वये सध्या पुणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी झालेले आहेत.
आपणांस या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माननीय व्हीव्हीआयपी यांचा पुणे भेट दौरा असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढणे हा पर्याय नसुन आपल्या मागण्यांचा कायदेशीर मार्गाने संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करावा. तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शासकीय कार्यालय, पुणे रेल्वे स्टेशन, शाळा व कॉलेज असून जवळच ससून हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुची हॉस्पिटल, के.ई.एम हॉस्पिटल असल्याने अॅम्ब्युलन्स ची सतत ये-जा असते त्यामुळे मोर्चा काढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवु शकतो.
तरी आपली दि. २५/०९/२०२४ रोजी जिल्हा परिषद पुणे विधानभन, आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ची मोर्चाची परवानगी तुर्तास नाकारण्यात येत आहे. तरी आपल्या अशा कृत्यामुळे सार्वजनीक शांतता भंग होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले विरूध्द उचित व योग्य कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. टीप सदरची नोटीस ही मा. न्यायालयात आपल्या विरुध्द पुरावा म्हणून सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(सामूहिक रजा आंदोलन आता 30 सप्टेंबरला.)
सर्व शिक्षक बंधू-भगिनींना कळविण्यात येते की,पुणे पोलीस विभागाने माननीय पंतप्रधान यांच्या पुणे दौऱ्यामुळे उद्याच्या मोर्चा संदर्भातील परवानगी नाकारल्यामुळे उद्याचे सामूहिक रजा आंदोलन व मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. आता सामूहिक रजा आंदोलन व शिक्षकांचा भव्य आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक ३०/०९/२०२४ रोजी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.उद्या सर्वांनी शाळेवर जावे ही नम्र विनंती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने केले आहे)