20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार हे सेवानिवृत्त शिक्षक
मुंबई (प्रतिनिधी):-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ अनुसार जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवा निवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहील्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यात डीएड व बीएड अर्हता धारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक मिळणार आहे
खालील गुगल लिंकवर जाऊन क्लिक करा व सर्व शासन निर्णय वाचा👏
https://drive.google.com/file/d/13lq80I22a2Ez1g9G4IaDw3eaSfQLAYRg/view?usp=drivesdk

