भोर तालुक्यातील बीएलओ यांनी या तारखेला उपस्थित रहा:-तहसीलदार राजेंद्र नजन

Maharashtra varta

 भोर तालुक्यातील बीएलओ यांनी या तारखेला उपस्थित रहा:-तहसीलदार राजेंद्र नजन



भोर (प्रतिनिधी):-पत्रकार टी .पवार.

भोर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  BLO यांनी आपले मतदान केंद्रावर दिनांक १०/०८/२०२४, ११/०८/२०२४ (शनिवार, रविवार) व दिनांक १७/०८/२०२४, १८/०७/२०२४ (शनिवार, रविवार रोजी विशेष शिबीरांचे आयोजन करावयाचे आहे. सर्व पर्यवेक्षक यांनी आपले अधिनस्त सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आप-आपले मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन   भोरचे तहसीलदार  राजेंद्र नजन यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोग यांचेकडून उक्त नमूद संदभीय पत्रान्वये सुधारीत मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ प्रसिध्द करणेत आलेला आहे. त्यानुसार दि. ०६/०८/२०२४ रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. दि०६/०८/२०२४ ते २०/०८/२०२४ या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकतो म्हणजेच नवीन मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती अथवा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 भोर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी आपले मतदान केंद्रावर दिनांक १०/०८/२०२४, ११/०८/२०२४ (शनिवार, रविवार) व दिनांक १७/०८/२०२४, १८/०७/२०२४ (शनिवार, रविवार रोजी विशेष शिबीरांचे आयोजन करावयाचे आहे. सर्व पर्यवेक्षक यांनी आपले अधिनस्त सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आप-आपले मतदान केंद्रावर उपस्थित राहतील या बाबत पर्यवेक्षण करून त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वा जमा केलेले फॉर्म न.६.७,८ या बाबत अहवाल या कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. सदर कामात कोणताही हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ होणार नाही याची दखल घ्यावी, अन्यथा संबंधितांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 134 नुसार कारवाई करणेत येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

To Top