भोर तालुक्यातील शिंद गावातील प्राथमिक शाळेत पालक सभेत घरोघरी अभ्यास कोपरा अभियान राबविण्याचा निर्णय...

Maharashtra varta

 भोर तालुक्यातील शिंद गावातील प्राथमिक शाळेत पालक सभेत घरोघरी अभ्यास कोपरा अभियान राबविण्याचा निर्णय...



 भोर (प्रतिनिधी):-पत्रकार टी .पवार.

रचना संस्था पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन पर उपक्रम राबविते. संस्था ग्रामीण भागातील 150 गावांत शिक्षण, कुपोषण व आरोग्य विषयावर गेली 32 वर्षे कार्यरत आहे.

या सभेत  शिंद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव मांदळे आणि शाळा व्यवस्थापन समिती च्या विद्यमाने शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे माधुरी उंबरकर आणि अध्यक्ष कीर्ती कुंभार तसेच माता पालक, ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी रचना संस्थेच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी अभ्यास कोपरा करण्याचा निर्णय पालकांनी घेतला.तसेच मुलांचा घरी अभ्यास चालू असताना पालकांनी मोबाईल, टीव्ही त्या वेळात बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

To Top