भोर तालुक्यात 24 जून रोजी होणार महावितरणच्या विरोधात सर्वात मोठे आंदोलन.
भोर तालुक्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत होणेबाबत व अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या त्वरीत होणेबाबत लेखी निवेदन पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांनी मुख्य अभियंता बारामती महावितरण यांना दिले आहे
त्या निवेदनात असे उल्लेख केला आहे की, गेली अनेक दिवस भोर तालुक्यामध्ये सातत्याने विजेचा लपंडाव होत असून तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावित आहे, तसेच शेतकरी वर्गाला शेतीपंपाच्या विजेची समस्या भेडसावित आहे. तालुक्यातील अनेक छोटया मोठ्या व्यवसायिकांना विजे संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यामुळे त्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच अनेक नागरीकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे विजेच्या लपंडावामुळे, व्होल्टेस कमी जास्त होत असल्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
वरील अडचणी हया पावसाळया अगोदर अधिकारी वर्गाने योग्य त्या उपाय योजना न केल्याने होत आहेत. तसेच वारंवार विजेसंदर्भात अनेक अडचणी / प्रश्न निर्माण होत असताना त्या अडचणी सोडविण्यास प्रशासन कमी पडत आहे. सदरील अडचणी सोडविण्यास प्रचंड विलंब होत असून अनेकदा संपूर्ण तालुका हा अंधारात राहत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. या सर्व गोष्टींना प्रशासन जबाबदार असुन मा. उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग भोर या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली करण्यात यावी. नाहीतर तालुक्यातील नागरीकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध म्हणून पुणे जिल्हा युवक कॉग्रेस, भोर तालुका युवक कॉग्रेस यांच्या वतीने सोमवार दि.२४/०६/२०२४ रोजी राजवाडा चौक भोर येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सदरील होणाऱ्या आंदोलनामधुन उदभवणाऱ्या परस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. तरी त्वरीत अकार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी व विजेचा पुरवठा सुरळीत होणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.

