कामथडी केंद्राच्या केंद्रमुखपदी सौ. साधना गायकवाड .
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
कामथडी केंद्राच्या केंद्रमुखपदी सौ. साधना महादेव गायकवाड यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.
गेले अनेक वर्ष रखडलेल्या कामाला पुणे जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. आणि या निवड प्रक्रियेत भोर तालुक्यात पाच केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली ,त्यामध्ये कामथडी केंद्राच्या पदी साधना महादेव गायकवाड यांची नियुक्ती झाल्याने तात्पुरता पदभार असलेल्या केंद्रप्रमुखांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

