तेलवडी येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन व दर्शन !

Maharashtra varta

 तेलवडी येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन !


 हजारो नागरिकांनी घेतले मंगल अक्षता कलशाचे दर्शन.



नसरापूर(पत्रकार विठ्ठल पवार) – अयोध्येहून प्रभु श्री रामचंद्र यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून ‘रामलला प्रतिष्ठान’कडून आलेला पवित्र मंगल अक्षता कलशाचे 24 डिसेंबरला तेलवडी येथे  विधीवत् पूजन  व दर्शन झाले. या वेळी सामूहिक आरती, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र यांचे पठण झाले.

मोठ्या थाटामाटात प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पार पडत आहे. ज्यांना या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य नाही, त्यांना याचे दर्शन घेता यावे; म्हणून हा मंगल अक्षता कलश तेलवडी येथे आणण्यात आला आहे. 

१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भोर तालुक्यात घरोघरी जाऊन श्रीराममंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि श्रीराम मंदिराची प्रतिमा यांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘श्री रामचंद्रांच्या या मंदिर उभारणीमध्ये संपूर्ण राष्ट्राचा सहभाग असावा’, हाच संदेश यामधून देण्यात येणार आहे. अशी माहिती भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संतोष धावले यांनी दिली.


या प्रसंगी तेलवडी पंचक्रोशी परिसरातील नागरिक,बंधू भगिनी  श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top