वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी ह.भ.प.संजय महाराज बोरगे यांची निवड.

Maharashtra varta

 वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी ह.भ.प.संजय महाराज बोरगे यांची निवड....


नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. ह.भ.प.राजाभाऊ महाराज चोपदार (श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार) तसेच  महाराष्ट्र राज्य सचिव ॲड.माधवीताई निगडे (सदस्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर) व माजी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.मारूती महाराज कोकाटे (अध्यक्ष.. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज) व माजी जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब बारवकर तसेच सर्व जिल्हा सदस्य, पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष व सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र आळंदी येथे नियुक्ती प्रदान समारंभ संपन्न झाला,

वारकरी सेवा संघाच्या वतीने वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जातात,

याकरिता महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी प्रत्येक तालुक्यात सेवा संघाची कार्यकारिणीची निवड करून गावोगावी सेवा कार्य रूजू केले 

सन २०२४/ २५ च्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते ह.भ.प. संजय महाराज बोरगे यांची नियुक्ती करण्यात आली, श्री बोरगे महाराज हे भोर तालुक्यातील करंदी खे.बा.येथील  आई कै.रुख्मिणी व वडील कै. विठ्ठल बोरगे यांचे सुपुत्र आहेत गेली तीस पस्तीस वर्षे ते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात व पालखी सोहळ्यात विविध प्रकारे सेवा कार्य करीत आहेत, प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार सेवा ते करित आहेत, गेली दोन वर्षे ते भोर तालुक्याचे अध्यक्ष होते, ते शिक्षणाने  इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय त्याचा आहे .आईवडिलांच्या पुर्वपुण्याईने त्यांना जिल्हा अध्यक्ष पद मिळाले असे ते मानतात.व ह.भ.प.राजाभाऊ महाराज चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे संपूर्ण जिल्ह्यात जोमाने सेवा कार्य करण्याचा संकल्प आहे.

To Top