करंदी खे.बा. रस्त्याचे दुरुस्ती काम अंधारात सुरु.. रस्ता अंधारात.

Maharashtra varta

 करंदी खे.बा. रस्त्याचे  दुरुस्ती काम अंधारात सुरु..  रस्ता अंधारात.




नसरापूर (प्रतिनिधी)

कामथडी (राष्ट्रीय महामार्ग) ते करंदी खे. बा. या रस्त्यासाठी आलेला  निधी, त्याबाबत  वर्क ऑर्डर प्रमाणे हे काम न झाल्याने ग्रामस्थांनी, नाराजी व्यक्त करत, रस्त्याचे काम बंद पाडले आहे व त्या ठेकेदारावर कारवाई करा. त्या ठेकेदाराची चौकशी करा, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी घेतला आहे.

  त्या ठेकेदाराने दुरुस्ती रस्त्याचे केलेले काम  निकृष्ट दर्जाचे असून त्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अन्यथा  युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना  पुण्याच्या कार्यालयासमोर केले जाईल, असा इशारा पुणे जिल्हा युवा सेनेचे नेते आदित्य बोरगे यांनी दिला आहे.

 काय रस्ता बनवला आहे? . कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण आहे ?,असा दुरुस्ती रस्ता असतो का?  नागरिक चर्चा करताना दिसत आहे. ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन या रस्ता दुरुस्ती कामाच्या माध्यमातून दिसत आहे.

करंदी खे. बा. च्या  तीन किलोमीटरसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आलेला 26 लाख 37 हजार 190 रुपयांचा निधी  मंजूर  झाला होता.हे काम रात्रीचे सुरू झाले.असे म्हणतात ना .
रात गयी बात गयी .
या उक्ती प्रमाणे ठेकेदार याने निकृष्ट दर्जाचे काम करत रस्त्याचे अक्षरशः वाटोळे करण्याचा प्रकार ठेकेदाराकडून झालेला आहे असा आरोप भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बोरगे यांनी केला आहे .

 राष्ट्रीय महामार्ग ते करंदी खे. बा. हा  तीन किलोमीटर साठी दुरुस्ती करिता आलेला निधी ठेकेदार याने  काम करीत असताना सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग पासून काही अंतर तसेच ठेवले आहे. व त्यापुढे  कामाला सुरुवात केली आहे, व हा रस्ता हायड्रॉलिक झाडूने सुव्यवस्थितरित्या साफ केलेला नाही.व नव्हता. तयार दाणेदार पृष्ठभागावर 0.25  ते 0.30 किलोग्राम प्रति चौरस मीटर दराने इमल्शन वितरक व्यवस्थित केलेले नाही.
 रॅपिड सेटिंग व्यवस्थित झालेली नाही .
टॅक कोट वर्कऑर्डर प्रमाणे नाही.
 रस्त्याचे थिकनेस सुयोग्य प्रमाणात नाही. रस्त्याचे काम लाईन, लेन्थ मध्ये झालेले नाही.
एस्टीमेट मध्ये दिलेल्याप्रमाणे MPM झालेले नाही.,वापरलेले डांबर निकृष्ट दर्जाचे आहे.
कार्पेटचा थीकनेस 20mm नाही.
साफसफाई न करता रस्त्याचे काम चालू केले.


शिवसेना नेते कुलदीप कोंडे म्हणाले की,, जसा घरामध्ये आपण शेण काला तयार करून सडा देतो तसा  ठेकेदाराने करंदीच्या दुरुस्ती रस्त्याला शेणकाला दिलेला आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे ठेकेदाराला काळ्या  यादीमध्ये टाकावे त्याची सखोल चौकशी करावी.

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे. विषय कामाच्या दर्जा बाबत तक्रार अर्ज व संबंधित ठेकेदाराला कोणतेही बिल आदा न करणे बाबत पत्र  ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी  दिले असल्याची माहिती सरपंच अलका तळेकर यांनी दिली आहे.

 त्या पत्रात असे नमूद केले आहे की,आपल्या विभागाचे कामथडी ते करंदी खे.बा रोड चे काम चालु असुन सदरील कामाचे ठेकेदार दत्तगुरु इंफ्रा.प्रा.लि हे आहेत सदर कामात खालील गोष्टी निदर्शनास आले आहेत,सदर काम हे  एस्टीमेट प्रमाणे होत नाही.व झाले नाही,
तरी वारंवार तक्रार करूनही कामाचा दर्जा न सुधारल्यामुळे  दिनांक ४/४/२०२२ सर्व ग्रामस्थांनी मिळून काम बंद करण्यास ठेकेदाराला सांगितले. सर्व ग्रामस्थांची विनंती आहे या कामाचे एस्टीमेट गावाला मिळावे व ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन सदर कामाचे बिल मंजुर व्हावे. व संबंधीत कामाची चौकशी करून सदरील ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही व्हावी हि विनंती.

ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी 
आमदार, संग्राम  थोपटे ,कार्यकारी अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो)जिल्हा परिषद सदस्य शलाकाताई कोंडे,खासदार सुप्रिया ताई सुळे
प्रधानमंत्री कार्यालय यांना याबाबत निवेदन मेलवर देऊन कळवले आहे.
To Top