"जिजाऊ ते सावित्री -सन्मान महाराष्ट्राच्या लेकिंचा अभियान अंतर्गत केलेली कविता

Maharashtra varta

 



सावित्रीच्या लेकी विविध क्षेत्रात गरुडभरारी घेत आहेत ,विविध क्षेत्र पादाक्रांत करत असताना गुणवत्तापूर्ण त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत, म्हणून त्या सामर्थ्यवान जिजाऊ सावित्रीच्या लेकी हो " तुम्ही जिजा सावित्री व्हा" असा संदेश कवितेच्या माध्यमातून देणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या प्रतिभावंत साहित्यिक चंदात्रय वाडकर यांनी सादर केलेली ही कविता.


       ★"तू जिजा सावित्री हो." ★


तू ज्ञानाची मशाल हो,स्त्रीजातीच्या अभिमानाची मिसाल हो

उजळुनी आयुष्य आपुले तू जिजा सावित्री हो


तू आईवडिलांची शान हो, संस्काराची खाण हो

दिपवुनी साऱ्या जगताला तू जिजा सावित्री हो


तू संकटांचा प्रहार हो,विजयाचा हार हो

झेपावुनी क्षितिजाकडे तू जिजा सावित्री हो


तू कणखर ढाल हो,सुभाग्याचे भाल हो

भेदुनी चक्रव्यूह संकटांचे तू जिजा सावित्री हो


तू संयमाचा बांध हो,मायेचा सागर हो

पाझरूनी माणुसकीचा झरा तू जिजा सावित्री हो


तू तुझाच शोध हो,सर्जनशीलतेचा आत्मबोध हो

देऊनी नवविचार समाजाला तू जिजा सावित्री हो


तू सत्कार्याची शक्ती हो,धैर्याची परिसीमा हो

उद्धारूनी अनेक पिढ्यांना तू जिजा सावित्री हो

तू मोकळा श्वास हो,फक्त तुझ्यासाठीच तू खास हो

लेऊनी कर्तृत्वाचे लेणे तू जिजा सावित्री हो


                                     साहित्यिक :-चंदात्रय 

To Top