छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने, महिलांसाठीचे ॲनिमिया मुक्त ग्राम अभियान केले यशस्वी संपन्न.

Maharashtra varta

 छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने, महिलांसाठीचे ॲनिमिया मुक्त ग्राम अभियान केले यशस्वी संपन्न.


वेल्हा (प्रतिनिधी)

पुणे डॉक्टर्स असोसिएशन व छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मांगदरी केतकावणे (ता.वेल्हा) गावातील महिलांसाठी ॲनिमिया मुक्त ग्राम कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात  ॲनिमिया मुक्त रुग्ण संख्या  दोनशे इतकी होती.याप्रसंगी पुणे डॉक्टर असोसिएशनचे सहभागी डॉक्टर्स अध्यक्ष डॉक्टर संभाजी मांगडे, उपाध्यक्ष डॉक्टर सचिन केदार, सचिव डॉक्टर रवींद्र कुमार काटकर ,खजिनदार डॉक्टर मेघना करांडे, सहसचिव डॉक्टर स्वप्नाली वाडेकर ,मा. अध्यक्ष डॉक्टर अनिल इंगळे, डॉक्टर मनोहर जाधव, डॉक्टर रमेश मोहिते ,डॉक्टर चंद्रशेखर जावळकर, डॉक्टर बालाजी कल्याणी, डॉक्टर नीरज जाधव डॉक्टर शर्वरी आवळसकर, डॉक्टर अंबिका गरड ,डॉक्टर अश्विनी घोडके ,डॉक्टर संतोष पेठकर,डॉ.मनीषा पेटकर उपस्थित राहून शिबिरात योगदान दिले.

 या शिबिरात रक्त तपासणी एचबी चे प्रमाण व रक्तातील शुगर तसेच बीपी तपासणी, रक्तवर्धक जंतनाशक कॅल्शियम औषधांचे वाटप यावेळेस करण्यात आले.

या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व  मान्यवर उपस्थित होते .त्यामध्ये सरपंच संपत मांगडे, उपसरपंच नितीन मांगडे, वेल्हा पतसंस्थेचे खजिनदार दशरथ भिलारे ,माजी सैनिक मुगाजी मांगडे ,तंटामुक्ती अध्यक्ष विनायक देशपांडे, जिल्हा परिषद मांजरीचे साधू हरपुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top