15 ऑगस्टला हरिश्चंद्रीकरांचा राष्ट्रीय महामार्गावर,रास्ता रोको आंदोलन होणार
भुयारी मार्ग होत नसल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया.
नसरापूर (प्रतिनिधी):-
हरिश्चंद्री गावच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर 15 ऑगस्ट 2021 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन पुणे,जिल्हाधिकारी ,तहसीलदार ,प्रांत भोर व राजगड पोलीस स्टेशन नसरापूर यांना दि.12 ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे.
15 ऑगस्टला हरिश्चंद्रीकरांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार असल्याचा निर्धार व्यक्त करत भुयारी मार्ग होत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावर तीव्र नाराजी दर्शवत "आम्ही रास्ता रोको" आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
निवेदनात असे म्हटले आहे की, हरिश्चंद्री ग्रामस्थांची 65 टक्के लोकांची शेती जमीन व गायरान राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे आहे. या आमच्या फाट्यावर भुयारी मार्ग होण्याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील आज अखेरपर्यंत भुयारी मार्ग होणे बाबत कोणतीही दखल प्रशासनाने घेतली न गेल्यामुळे नाईलाजास्तव हरिश्चंद्री गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा हरिश्चंद्री गावाच्या मधून जात असल्याने येथे झालेल्या अपघातामुळे गावातील आठ ते नऊ कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहे ,त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी गावातील तरुणांनी 3/ 6/ 2019 रोजी तहसील कार्यालय भोर येथे व आजपर्यंत अनेक वेळा उपोषण केले. परंतु त्या ठिकाणी देखील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक पुणे यांनी खोटे आश्वासन देऊन ग्रामस्थांचे दिशाभूल करून फसवणूक केली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा हरिष्चंद्री गावाच्या मधूनच जात असल्याने गावातील दैनंदिन कामासाठी गावातील नागरिकांना रोज हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जावे लागते. गावातील ग्रामस्थांनी 21 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे .तरी आज अखेर सदर गोष्टींची कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी नाईलाजाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळेस हरिश्चंद्री गावचे सामाजिक कार्यकर्ते राम पाचकाळे यांनी बोलताना सांगितले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष होऊन देखील आमच्या गावाला मूलभूत गरज असणाऱ्या भुयारी रस्त्यासाठी जर इतका पाठपुरावा करून देखील भुयारी मार्ग मिळत नसेल ,तर आम्ही उघड्या डोळ्यांनी आमच्या घरातील लोकांची अपघातामुळे होणारी त्या पाहु शकत नाही, प्रशासनाने आमची योग्य ती दखल न घेतल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

