आदित्य बोरगे मित्र परिवारातर्फे मोफत जेवणाचा डबा
पुणे( प्रतिनिधी)
आदित्य बोरगे मित्र परिवारातर्फे पुणे परिसरामध्ये दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णास व त्यांच्या नातेवाईक यांना जेवणाची अडचण होत असेल तर पौष्टिक जेवणाचा डबा विनामूल्य दवाखान्यात पोच करण्याचं काम आदित्य बोरगे मित्र परिवारातर्फे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सध्या कोरोना रोगाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. या स्थितीत दवाखान्यामध्ये असलेल्या रुग्णांना मोफत पौष्टिक जेवणाची सोय आदित्य बोरगे मित्रपरिवाराने उपलब्ध करून देऊन एक आदर्श सामाजिक काम केलेले आहे असे मत विनय आढाव यांनी व्यक्त केले आहे.

