करंदीचा उपसरपंच कोण ?

Maharashtra varta

 करंदीचा उपसरपंच कोण ?




नसरापूर( प्रतिनिधी) :


मागील आठ दिवसापूर्वी करंदीच्या उपसरपंच अंकिता रुपेश गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण करत ठरल्या प्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच अलका तळेकर यांच्याकडे सुपूर्त करून पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.उर्वरित राहिलेल्या दोन वर्षांकरिता उपसरपंच कोण होणार ? कोणाला उपसरपंच पद दिले जाणार? याची उत्सुकता  नागरिकांत शिगेला पोहचली असल्याचे दिसून येते आहे.

 उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी जोरदार लॉबिंग करत उपसरपंच पद मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा व ताकद पणाला लावली असल्याचे चित्र सध्या करंदी खे. बा. गावात दिसून येत आहे .त्यासाठी रात्रीच्या बैठका होत आहेत, एकमेकांची मनधरणी होत आहे. उपसरपंच पद अमुक याला नको,तमुक व्यक्तीस द्या अशी चर्चा कानावर पडताना दिसत आहे .सदस्याला  मागील काळात दिलेला शब्द  पाळला जाणार का,?

का वेगळे चित्र दिसणार ? याबाबत मोठी कसोटी संबंधितांची लागणार आहे.

To Top