पुणे जिल्हा डोंगरी विकास समिती माध्यमातून भोर तालुक्यातील विविध विकास कामासाठी 45 लाख निधी.
भोर (वार्ताहर)
पुणे जिल्हा डोंगरी विकास परिषदेचे सदस्य विश्वास ननावरे यांच्या विशेष प्रयत्नातून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2020-21अंतर्गत भोर तालुक्यातील विविध विकास कामासाठी 45 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. सदर प्रस्तवित कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती डोंगरी विकास परिषद सदस्य विश्वास ननावरे यांनी बोलताना दिली.
ते म्हणाले की मंजूर कामे पुढील प्रमाणे आहेत ,मौजे निगडे अंतर्गत रस्ता तीन लक्ष, तेलवडी सभामंडप तीन लक्ष, मोहरी खुर्द जोड रस्ता तीन लक्ष, हातवे खुर्द अंतर्गत रस्ता तीन लक्ष, केळवडे सभामंडप तीन लक्ष, जोगवडी अंतर्गत रस्ता तीन लक्ष, ब्रह्मनघर सभामंडप तीन लक्ष, आळंदे अंतर्गत रस्त तीन लक्ष, वडतुंबी भैरवनाथ मंदिर चौक करणे तीन लक्ष, भाबवडी जिल्हा परिषद शाळा भिंत करणे तीन लक्ष, दिवळे अंतर्गत रस्ता तीन लक्ष, उंबरे अंतर्गत रस्ता तीन लक्ष, धांगवडी अंतर्गत रस्ता तीन लक्ष, नसरापूर अंतर्गत रस्ता तीन लक्ष, कांजळे अंतर्गत रस्ता तीन लक्ष अशी एकूण पंचेचाळीस लक्ष रुपयांची विविध विकास कामं होणार आहेत .सदर कामे तातडीने सुरू करून दर्जेदार कामे करणार असल्याचे ननावरे यांनी सांगितले.
यावेळी भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे व भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संतोष धावले,निलेश कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

