विवाहातून वाल्हेकर व खुटवड परिवाराने बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेस केली,अकरा हजार रुपयाची मदत.
नसरापूर (वार्ताहर):-
विवाहातून वाल्हेकर व खुटवड परिवाराने बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेस अकरा हजार रुपयाची मदत केली आहे.
नसरापूर ता. भोर येथील कै. सोपान दगडू वाल्हेकर यांची नात व सुनील सोपान वाल्हेकर यांची कन्या चि. सौ.कां. सायली हिचा विवाह, उंबरे ता. भोर येथील कै. बाळासाहेब खुटवड यांचे चि. मंदार यांच्याशी नुकताच हेरिटेज रिसॉर्ट साखर मेरावणे येथे संपन्न झाला .
या लग्नात विवाह समारंभास फाटा देत व मान्यवरांच्या सत्कार समारंभ समारंभ टाळून वाल्हेकर व खुटवड परिवाराने विवाहातील उर्वरित राहिलेली 11 हजार रुपये रक्कम बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. व अनाथांची माय नवनाथ महाराज लिमण यांना व त्यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देऊन समाजात एक वेगळा आदर्श वाल्हेकर व खुटवड परिवारानं दाखवून दिला आहे.
या विवाह समारंभात भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे ,पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक युवराज बेलदरे ,नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे ,निवृत्त डी. वाय. एस. पी .यशवंतराव कदम,भोर वेल्हा मुळशी चे नेते विक्रमदादा खुटवड ,गणेश खुटवड, संतोष अप्पा दसवडकर व भोर ,वेल्हे तसेच पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार यांनी केले.
यावेळेस बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज लिमण बोलताना म्हणाले की, समाजामध्ये उदार हस्ते काम व मदत करणारी अनेक माणसे असतात. त्यामध्ये नसरापूर मधील सुनिल वाल्हेकर परिवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून आज आमच्या संस्थेला मिळालेली मदत खूप मोठी असून ती न विसरता येण्यासारखी आहे.