प्रमोदशेठ दुगड यांना राज्यपालांच्या हस्ते भारत लीडरशिप व कोरोना योद्धा पुरस्कार.
कोरोनामध्ये समाजासाठी "देवदूतासारखे" धावून आले.
पुणे (विशेष प्रतिनिधी)
कोरोना काळात पुणे जिल्ह्याचे विशेषत पुणे शहराचे प्रसिद्ध नामांकित व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रात नावलौकिक असलेले दुगड ग्रुपचे चेअरमन प्रमोद शेठ दुगड यांनी आदर्श समाजकार्य केले. त्या समाजकार्याची उचित दखल घेऊन त्यांचा "द लेक्सिकाँन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट" तर्फे 'भारत लिडरशिप' पुरस्काराबरोबर कोव्हीड योद्धा 2020 या सन्मानाने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दुगड ग्रुपचे चेअरमन प्रमोद शेठ दुगड यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. कोरोना महामारी च्या काळात दुगड ग्रुप तर्फे गोरगरीब वंचित निराधारांना मोठ्या प्रमाणात मोफत भोजनाची व निवासाची विशेष सोय व मदत करण्यात आली होती.
हे कार्य करताना ज्येष्ठ उद्योजक व आदर्श समाजसेवक माणिकचंद दुगड यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या "माणिकचंद दुगड" यांनी अखेरपर्यंत निस्वार्थपणे गरजूंची सेवा शुश्रूषा व मदत केली आहे. त्यांनी शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय,प्रेरणादायी दीपस्तंभाप्रमाणे आदर्श समाजकार्य केले आहे.
माणिकचंद दुगड यांनी आदर्श मानवतेची सेवा व गोवंश संवर्धन वसा व वारसा अबाधित ठेवला.
"आदर्श संस्कार वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा...
दुगड ग्रुपचे चेअरमन 'प्रमोदशेठ दुगड' "न्यूज वार्ता"शी बोलताना म्हणाले की,वडिलांनी दिला आदर्श संस्कार वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आमच्या वडिलांचा सेवावृत्ती भाव व सामाजिक काम, आदर्श संस्कार आम्ही आगामी काळात जपू,हा पुरस्कार त्यांच्या पायी ठेवून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो.
•दुगड ग्रुप म्हणजे आधुनिक श्रावणबाळ.
कोरोना महामारी च्या काळात पुणे शहरातील कामगार, मजूर परराज्यातील मजूर पोलिस प्रशासन व वैद्यकीय सेवा देणाऱ्या अशा लाखो नागरिकांना मोफत अन्नधान्य, त्यांना मास्क,सॅनिटायझर त्याचबरोबर कोरोना रुग्णांना घरपोच जेवणाचे डबे पोचवण्याचे आदर्श काम दुगड ग्रुपच्या माध्यमातून झाले आहे.म्हणून तर सर्वसामान्य ,वंचित, निराधार नागरिक म्हणतात, "दुगड ग्रुप म्हणजे आमचा श्रावणबाळ आहे."