कष्टकरी महिलांच्या सन्मानाने राजमाता जिजाऊंना मानवंदना.

Maharashtra varta

 पाचाड येथे कष्टकरी महिलांच्या  सन्मानाने राजमाता जिजाऊंना मानवंदना.



 

भोर (प्रतिनिधी)

मावळा जवान संघटनेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त रविवारी ( दि.१५) पाचाड येथे राजमाता जिजाऊं समाधी  स्थळावर रायगड परिसरातील कष्टकरी महिलांना साडी, चोळी ,मिठाईची भाऊबीज  भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली.

"जय जिजाऊ, जय शिवराय" च्या जयघोषात पांरपारीक रिवाजात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ . शितलताई मालुसरे व इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या समाधीचे पुजन करण्यात आले. 

समाधी स्थळावर आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती.शेकडो पणत्याच्या प्रकाशात समाधी परिसर उजळून निघाला होता. जिजाऊंच्या जयघोषाने शिवकाळ जागा झाला.

 प्रा.नामदेव जाधव ,शुरवीर गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्र गायकवाड, विजय तनपुरे,संदिप वाडेकर, राजेंद्र सोनवणे, पाचाडच्या सरपंच संयोगिता गायकवाड ,आण्णासाहेब चव्हाण ,निखिल तनपुरे ,सुनिल ढेबे ,कृपाल महाडिक, प्रदिप सरखले आदींसह रायगड, पुणे कोल्हापूर परिसरातील शिवभक्त सहभागी झाले होते.

राजमाता जिजाऊ यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

राजमाता जिजाऊ , शिवाजी महाराज यांच्या  प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी मावळा जवान संघटनेच्या पाचाड ,रायगडाच्या मातीत वैभवशाली शिवकाळाला उजाळा देण्यात आला. संयोजन मावळा संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित नलावडे  यांनी केले.


To Top