तुलसी, याच्यापुढे गळ्यात जीत घालायचं, हार नाही.राजसाहेब ठाकरे.

Maharashtra varta

 तुलसी, याच्यापुढे गळ्यात जीत घालायचं, हार नाही :-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे.



मुंबई (प्रतिनिधी)

राजसाहेब ठाकरे यांच्या गळ्यात पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी सुगंधित चाफ्याच्या फुलाचा हार घालताना राजसाहेब म्हणाले , तुलशी "याच्यापुढे गळ्यात जीत घालायचं, हार नाही." असे म्हणत "कार्यकर्ता" हा मनसे पक्षासाठी महत्वपूर्ण असून त्यांना मानाचे स्थान आहे, असा संदेश तमाम महाराष्ट्र राज्यातील मनसे सैनिकांना राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे.

दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी  राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यास जातात. त्यांच्याप्रति प्रेम,आदर,निष्ठा सन्मानपूर्वक व्यक्त करतात.राजसाहेबांवर अपार व श्रद्धा व निष्ठा असलेले पालघरचे मनसे सैनिक तुलसी जोशी यांना भेटण्याचा योग कृष्णकुंजवर  आला.

त्यावेळेस तुलसी "याच्यापुढे गळ्यात जीत घालायचं, हार नाही." असे म्हणत मनसे अध्यक्ष राजसाहेबांनी राज्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना या निमित्ताने  विजयाचा एक संदेश दिला आहे.राजसाहेब ठाकरे हे जसे राज्यातील मनसेचे नेते, पदाधिकारी, आमदार,नगरसेवक, यांच्यावर जसे प्रेम करतात,त्यांना जसा मान सन्मान देतात तसेच प्रेम व मान सन्मान सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील आहे. ,हे तुलसी जोशी यांना सूचित केलेल्या विधानावरून दिसून येते आहे.मनसेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षासाठी मोठा आहे, असा संदेश राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे.

राजसाहेब ठाकरे यांनी काढलेल्या उदगाराबद्दल मनसे सैनिक तुलसी जोशी म्हणाले की, लक्ष्मी मातेच्या आशिर्वादाने येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय प्राप्त होणारचं आहे. राजसाहेबांच्या गळ्यात विजयाचा हार पडणारच आहे. तसेच आजचे राजसाहेबांचे शब्द माझ्यासाठी प्रमाण मानून मी पक्षाच्या विजयासाठी शक्य तितक्या प्रमाणात नक्कीच योगदान देईन, हे वचन मी माझ्या राजसाहेबांना दिलेले आहे.



To Top