दुर्गम भागातील 40 शाळांना ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना प्रतिबंध साहित्य.

Maharashtra varta

 दुर्गम भागातील 40 शाळांना ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना प्रतिबंध साहित्य.

भोर (प्रतिनिधी)

टिटेघर ता.भोर येथील लोकाभिमुख ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्याच्या दूर्गम,डोंगरी भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक 40 विद्यालयांना विद्यार्थी, शालेय परिसर,वर्गखोल्या स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य मोफत दिले.

    भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयाच्या आचार्य अत्रे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे होते.कार्यक्रमास पिसावरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष ढवळे,वराळे,.एल.एम भांगे व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर,संतोष दळवी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून इयत्ता ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू होत आहेत.तथापि शालेय परिसर ,वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी शासनाने नियमावली जाहिर केली आहे.त्यानुसार शाळांनी साहित्य खरेदी  करणे आवश्यक होते.त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक शाळेला विद्यार्थी संख्येइतके,मास्क,हँडवाॕश,सॕनिटायझर,आॕक्सीमिटर,थर्मलगण,  हायपो,  आदी साहित्य मोफत देण्यात आले.तसेच सर्व शाळांमध्ये सेनेटाईझर फवारणी करून देण्यात येणार आहे. याप्रसंगी श्री.केळकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालये सुरू होत असताना विद्यार्थ्यांच्या  आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.त्यासाठी दूर्गम भागातील शाळांना साहीत्य तातडीने उपलब्ध करून देत व यासाठी सुमारे दीड लक्ष खर्च अपेक्षित  असल्याचे केळकर यांनी सांगितले.याप्रसंगी ढवळे,भांगे, वराळे,शेटे यांची भाषणे झाली.या निमित्ताने अनेक शाळांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.शेवटी  दळवी यांनी आभार मानले.

यासाठी हिर्डोशी खोरे, आंबवडे खोरे, विसगाव खोरे, महुडे खोरे,पसुरे खोरे, तसेच भुतोंडे जोगवडी खोरेतील शाळांची निवड केली आहे.

To Top